सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व अन्य दहा जणांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियममधील तरतुदींचे उल्लंघन

Aishwarya Dubey
  • Sep 3 2020 10:20AM

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व अन्य दहा जणांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल मंदिरासह राज्यातील मंदिरे भाविकांसाठी उघडावीत या मागणीसाठी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पंढरीत आंदोलन करण्यात आले होते.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करावे. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेना, बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपुरात सोमवारी आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर (रा. अकोला जि. अकोला), अरुण बुरघाटे (रा. मुक्ताई मठ,पंढरपूर), आनंद चंदनशिवे रा. सोलापूर), धनंजय वंजारी, अशोक सोनोणे, रेखाताई ठाकूर, हभप नामद महाराज, बबन शिंदे, सागर गायकवाड (रा. पंढरपूर), रवि सर्वगोड, गणेश महाराज शेटे रा. अकोला, माउली हळणवार (रा. ईश्वर वठार, ता. पंढरपूर), यांच्यासह ११०० ते १२०० जमाव जमवून मिळून आले. त्यांच्या या आंदोलनामुळे  जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांनी करोना रोगाच्या अनुषंगाने लागू केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आदेशाचे उल्लंघन झाले आहे.  या सर्वानी जमाव जमवून, मुखपट्टी न लावता, सुरक्षित अंतर न ठेवता हे आंदोलन केले. यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियममधील तरतुदींचे उल्लंघन झाले आहे, असे सांगण्यात आले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार