सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोविड-१९ साथ रोग नियंत्रणासाटी मनुष्यबळ, साधनसामुग्री व IEC उपलब्ध करुन देण्याचे - जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांचे निर्देश

जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रामध्ये कोविड-१९ ची रूग्णसंख्या वाढत असून आरोग्य विभागाकडील मनुष्यबळ, साधनसामुग्री अपुरी पडत असल्याने नगरपरिषद व नगरपंचायतीमार्फत वाढीव तांत्रिक मनुष्यबळ

Manish Gupta
  • Aug 1 2020 11:24AM
पालघर दि 31 :  जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रामध्ये  कोविड-१९ ची  रूग्णसंख्या  वाढत असून आरोग्य विभागाकडील मनुष्यबळ, साधनसामुग्री अपुरी पडत असल्याने नगरपरिषद व नगरपंचायतीमार्फत वाढीव तांत्रिक मनुष्यबळ,  शिघ्र प्रतिसाद पथक, सर्वेक्षण करण्या करिता  मनुष्यबळ,तसेच  शहरातील नागरीकांकरीता अॅन्टीजेन टेस्ट किट उपलब्ध करणे आवश्यक असल्याने  जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी मुख्याधिकारी, नगरपरिषद पालघर,  मुख्याधिकारी,डहाणू व जव्हार, नगरपंचायत तलासरी/विक्रमगड ,मोखाडा/वाडा यांना निर्देश दिले  आहेत.

यामध्ये  नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील वाढत्या कोविड रूग्णांचा सुरूवातीच्या टप्प्यातच शोध घेऊन उपचार करण्याकरीता फिवर क्लिनिक सुरू करणे याकरीता वैद्यकीय अधिकारी व त्यांना लागणारा तांत्रिक कर्मचारी वर्ग भरती करणे याकरीता तालुका आरोग्य अधिकारी यांना आवश्यक असलेले मानधन नगरपरिषद व नगरपंचायतकडून वर्ग करण्यात यावे. या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचेकरीता आवश्यकतेनुसार एका स्वतंत्र वाहनाची व्यवस्था
नगरपरिषद व नगरपंचायतीने करून द्यावी. नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना अँटीजन टेस्ट करण्याकरीता तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे अँटीजन टेस्ट किट करीता आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा.
नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील सर्व कुटुंबांचा सर्वे नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर करण्यात यावा. याकरीता आवश्यक ते मुनष्यबळ नगरपरिषद व नगरपंचायतीने उपलब्ध करून द्यावे व आरोग्य विभागातील कर्मचारी यांचे मदतीने सर्वेक्षणाचे काम करावे.अशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिल्या आहेत.
तसेच  तालुका आरोग्य अधिकारी यांना मध्यवर्ती नियंत्रण कक्षाकरीता डाटा एंट्री ऑपरेटर उपलब्ध करून द्यावा.
आरोग्य सेविका तसेच नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात सर्वेक्षण करणारे कर्मचारी यांना आवश्यकते प्रमाणे थर्मल मशिन, पल्स ऑक्सीमीटर, मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज इ. साधनांचा पुरवठा करण्यात यावा. जनजागृतीकरीता बॅनर, पोस्टर, लाऊडस्पिकरद्वारे जाहीर आवाहन याप्रकारचे IEC प्रकल्प सतत राबविण्यात येणार आहे. 
 नगरपरिषद व नगरपंचायतीस उपरोक्त बाबीकरीता निधीची कमतरता असल्यास १४ व्या वित्त
आयोग योजनेतून मंजूरीकरीता प्रस्ताव सादर करण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे  यांनी दिल्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार