सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यात मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली

राज्यात आज 10 हजार 14 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यात आजपर्यंत तीन लाख 68 हजार 435 रुग्ण बरे झाले आहेत.

Aishwarya Dubey
  • Aug 12 2020 10:59AM

 राज्यात मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल अकरा हजार 88 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 5 लाख 35 हजार 601 एवढी झाली आहे. तर दिवसभरात 256 रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्यातील मृत्युदर 3.42 टक्के इतका आहे. राज्यात आज 10 हजार 14 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यात आजपर्यंत तीन लाख 68 हजार 435 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 68.79 टक्के एवढं झालं आहे.

राज्यात सध्या दहा लाख 4233 व्यक्ती घरात विलीगिकरणात आहेत तर 35 हजार 648 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण यामध्ये आहेत. एक लाख 48 हजार 553 ऍक्टिव्ह रुग्ण संख्या आहे.

आज ठाणे महापालिका क्षेत्रात 173 कोरोणा पॉझीटिव्ह  रुग्णांची नोंद झाली.

कोविड 19 चाचणी आता १९०० रुपयांत करता येणार आहे. घरी चाचणी करणार्यांना २२०० रुपये दर असेल. मास्क आणि सँनेटाईजरचे दर नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हा निर्णय होईल. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जगभरातील कोरोना लशीच्या स्पर्धेत रशियाने (russia) बाजी मारली आहे. रशियाने जगातील पहिली कोरोना लस (russian corona vaccine) तयार केली आहे. Sputnik V असं या लशीला नाव देण्यात आलं आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचे सांगितलं. आता या लशीसाठी जगभरातील 20 देशांनी आधीच ऑर्डर देऊन ठेवल्या आहेत. दरम्यान ही रशियन लस भारतातही दिली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

भारताला आतापर्यंत ऑक्सफर्डच्या कोरोना लशीकडून आशा होती. या लशीमध्ये भारताची भागीदारीही आहे. मात्र ही लस सध्या क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे आणि रशियाने आपली कोरोना लस तयार असल्याची आनंदाची बातमी दिली. त्यामुळे या लशीकडे सर्वांचं लक्ष लागलं.

"रशियाची ही लस जर यशस्वी ठरली तर ती किती सुरक्षित आणि परिणामकारक आहे हे पाहावं लागेल आणि तसं असेल तर लशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची क्षमता भारताकडे आहे", असं दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार