सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्त्री द्वेष, थट्टा आणि कोरोनात अपप्रचार करणाऱ्या टिक टॉक सारख्या समाज माध्यमांना गृहमंत्र्यांचा कडक इशारा

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याआधी 13 एप्रिल ला देखील लॉक  डाऊन चा काळात स्त्रियांच्या संरक्षणाबद्दल आणि त्यांना सुरक्षा देण्याबद्दल कडक  नियमांचे पालन केले जाईल. अशी ताकीद दिली होती.  त्यासाठी सायबर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल

Snehal Joshi
  • May 21 2020 2:42PM

नागपूर - महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याआधी 13 एप्रिल ला देखील लॉक  डाऊन चा काळात स्त्रियांच्या संरक्षणाबद्दल आणि त्यांना सुरक्षा देण्याबद्दल कडक  नियमांचे पालन केले जाईल. अशी ताकीद दिली होती.  त्यासाठी सायबर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच स्त्री द्वेष आणि स्त्री अवहेलना  करणारे व्हिडिओ टाकता कामा नये असे  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टिक- टॉक सारख्या समाज माध्यमांना सक्तीचे ताकीद दिली आहेत.  स्त्रियांसाठी महागुन्हा ठरलेल्या ऍसिड हल्ल्याचे आणि बलात्काराचे समर्थन करणाऱ्या टिक - टॉक वरील व्हिडीओ बद्दल प्रतिक्रिया देताना गृहमंत्र्यांनी हे विधान केले आहे.  स्त्री सुरक्षितता  गृहमंत्रालयाची प्रमुख प्राथमिकता आहे अशीही ते म्हणाले.. 
 गृहमंत्र्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र सायबर सेलला सायबर गुन्हे करणाऱ्या समाजकंटकांवर विरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याचेही अनिल देशमुख यांनी नमूद केले पोलिसांकडून सीआरपीसी कलम -149 अन्वये समाज घटकांना नोटीस दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 सर्व आयुक्त व जिल्हा पोलीस प्रशासनाला  समन्वय साधून काम करीत आहे. व ते 
टिक - टॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सामाजिक माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. असे अनिल देशमुख म्हणाले तसेच या काळात महाराष्ट्र सायबर ने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ते  बोलले की महाराष्ट्र  सायबरनी  जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनात आले की आक्षेपहार्य व्हाट्सअप मेसेज फॉरवर्ड केल्या प्रकरणी 170 गुन्हे दाखल झाले आहे. तर आक्षेपहार्य फेसबुक  पोस्ट शेअर केल्या प्रकरणी 158 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  इंस्टाग्राम  वरून चुकीच्या पोस्ट टाकल्या प्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले. तर अन्य सोशल मीडियाच्या ऑडिओ क्लिप, युट्युब गैरवापर केल्याप्रकरणी 43 गुन्हे दाखल झाले आहेत आणि त्यामध्ये आतापर्यंत 213 आरोपींना अटक केली गेली आहे. यापैकी 102 आक्षेपार्ह पोस्टस takedown देखील करण्यात आल्या आहे.

 लॉक डाऊन  सुरू झाल्यापासून कोरोना  महामारी च्या संदर्भात विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते.  सदर गुन्हे हे मुख्यतः टिक टॉक व्हिडिओ बनवणे, सोशल मीडियावर वेगवेगळ्या भडकाऊ पोस्ट टाकणे, करोना महा मारीला धार्मिकतेचा  रंग देणाऱ्या पोस्ट टाकणे, करोना  महामारी बद्दल चुकीची माहिती देणे. करोना   रुग्णांची नावे जाहीर करणे. विविध राजकीय नेत्यांची बदनामी करणारे. खोटे पोस्ट, फोटोज टाकणे .  स्त्रियांवर हीन दर्जाची आणि वैयक्तिक टीका करणे. सर्वसाधारण नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणे. इत्यादी  गुन्ह्यांचा समावेश आहे. सदर वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र सायबरला   मार्गदर्शन केले व सदर गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सक्त आदेश देण्यात आला आहे.

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

कोरोना के कारण पीड़ित गरीब लोगो के लिए आर्थिक सहयोग

Donation
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार