सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यात शाळा सुरू करून

शाइस्त्राईल सारखी चूक करू नये....आमदार महेश लांडगे...

दिपक चव्हाण पुणे
  • Jun 10 2020 4:52PM
देशात कोरोना महामारी चे मोठे संकट आस्ताना महाराष्ट्र राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत आसुन राज्य सरकार राज्यात  शाळा सुरूर करण्याचा निर्णय घेत आसुन सरकार ने आधी राज्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या उपायोजना कराव्यात त्या नंतर महाराष्ट्रातील शाळा- महाविद्यालये सुरू करण्या यावे नहीं तर राज्यात इस्त्राईल सारखी परस्थिति निर्माण होऊ शकते  इस्त्राईलमधील शाळा सुरू करण्याची चूक इस्त्राइल खुप महागात पडली आहे तसी वेळ महाराष्ट्रा वर येउ नये या साठी पिंपरी चिंचवड़ भाजपा शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले आहे...


याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले आहे.त्यामध्ये म्हटले आहे की,कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्वप्रथम शाळा-महाविद्यालये तत्काळ बंद केली,आता त्या पुन्हा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे.  या निर्णयाचा फेरविचार करावा लागले.कारण, इस्त्राईलमधील शाळा सुरू करण्याची चूक महागात पडली आहे....

इस्त्राईलमधील १२० शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. अवघ्या तीन आठवड्यात या शाळांमधील ३४७ विद्यार्थी व शिक्षक कोरना पिझिटिव्ह झाले आणि संभाव्य धोका ओळखून सरकारने तत्काळ पुन्हा सर्व शाळा बंद केल्या. आज सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्याच वेळ ईस्त्राईलवर आली आहे. पालक चिंताग्रस्त असून, प्रशासनाच्या निर्णयावर संतापले आहेत. शाळा-महाविद्यालये सुरू केल्यास काय परिणाम होतील. याचा दाखला ईस्त्राईलच्या रुपाने बोलका आहे शाळा सुरू करुन पुन्हा बंद करण्याची वेळ येवू नये...।


दुसरीकडे, कोरोना आणि लॉकडाउनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे रोजगार आणि नोकरी गेली आहे. दोन महिन्यांचा पगार अनेकांना मिळालेला नाही. अशा परिस्थितीत दैनंदिन खर्च कसा भागवायचा याची चिंता पालकांना आहे. अशा परिस्थितीत शाळा-महाविद्यालयांनी शालेय शुल्क भरण्यासाठी पालकांकडे तगादा सुरू केला आहे. तसेच, व्हर्च्युअल वर्ग सुरू करुन मोबाईल- टॅब खरेदीसाठी सूचना केल्या जात आहेत.
अपणांस विनंती की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ करण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावा. तसेच, डोनेशन अथवा विकास निधीबाबत पालकांना शाळा प्रशासनाने वेठीस धरू नये, याची योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.....


तसेच, राज्य सरकारने शाळा सुरू करुन पालकांची चिंता वाढवू नये.सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तरीही पिंपरी-चिंचवडमधील एकही शाळा भारतीय जनता पार्टी सुरु होवू देणार नाही. अगोदर संसद, विधानसभा, शासकीय सर्व कार्यालये सुरू करा. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा,असा इशारा पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे....


मुलांचे वर्ष वाया जावू नये; पालकांची अपेक्षा 
दरम्यान, शाळा सुरू करुन विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल, असा निर्णय राज्य सरकारने सध्यातरी घेवू नये. तसेच, शालेय शुल्क भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई करावी. विशेष म्हणजे, मुलांचे वर्ष वाया जाणार नाही. याचाही सरकारने विचार करावा, अशी मागणी पालक संघटनांकडून होत आहे. त्यामुळे राज्य सकारने शाळांबाबत निर्णय घेताना पालक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार