सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबई-पुण्यात कोरोना कहर कायम

महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या 47190 वर पोहोचली आहे. राज्यात एकूण 4 लाख 85 हजार 323 जण होम क्वारंटाइन आहेत तर 33545 लोकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं आहे.

Aishwarya Dubey
  • May 23 2020 10:45PM

महाराष्ट्रात Coronavirus चं थैमान सुरूच आहे. मुंबई, उपनगरं आणि पुण्यात गेल्या 24 तासांत खूप जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. दिवसभरात तब्बल 2608 रुग्ण राज्यभरातून वाढले आहेत. गेल्या 24 तासांत 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू नोंदला गेला आहे. यातले 40 मुंबईतले तर 14 पुण्यातले रुग्ण आहेत. राज्यभरात कोरोनाबळींच्या संख्येने कालच दीड हजाराचा टप्पा ओलांडला होता. आतापर्यंत 1577 जणांचा या कोरोनाच्या साथीत बळी गेला आहे. ही देशातली सर्वात मोठी संख्या आहे.

राज्य सरकारने शनिवारी संध्याकाळी पाठवलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या 47190 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात 3,48,026 जणांची COVID-19 ची चाचणी करण्यात आली आहे. राज्यभरात घरी विलगीकरणात असलेले (Home Quarantine) 4 लाख 85 हजार 323 जण आहेत तर 33545 लोकांना संस्थात्मक विलगीकरणात (Institutional Quaratine) ठेवण्यात आलं आहे.

आज राज्यात नोंद झालेल्या 60 रुग्णांपैकी 40 गेल्या 24 तासांत नोंदले गेले आहेत, तर उर्वरित गेल्या पंधरवड्यातले आहेत.

एकूण कोरोना मृत्यू 60

मुंबई - 40

ठाणे - 1

वसई विरार - 1

पुणे - 14

सोलापूर - 2

सातारा - 1

नांदेड - 1

आज दिवसभरात

नवे रुग्ण 2608

मृत्यू--60( मुंबई 40, पुणे 14)

एकूण मृत्यू--1577

एकूण- 47190

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

कोरोना के कारण पीड़ित गरीब लोगो के लिए आर्थिक सहयोग

Donation
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार