सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजपा सेवाकार्य, मेडिकल रूग्णालयाला भेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

नागपूर महानगरातील विविध मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू असलेल्या सेवाकार्याचा आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. महानगरातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी या दौर्‍यात त्यांच्यासमवेत होते.

Sudarshan MH
  • May 15 2020 10:54AM

नागपूर महानगरातील विविध मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू असलेल्या सेवाकार्याचा आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. महानगरातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी या दौर्‍यात त्यांच्यासमवेत होते.

आज सकाळच्या सत्रात देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाला भेट दिली आणि तेथील अधिष्ठाता डॉ. सुजल मित्रा यांच्याशी चर्चा करून कोरोनासंदर्भात केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. नव्याने उभारण्यात आलेल्या आयसीयू वॉर्डाची पाहणी केली, तसेच व्हीडिओ कॉल्सच्या माध्यमातून काही रूग्णांशी सुद्धा संवाद साधला. सायंकाळच्या सत्रात त्यांनी विविध सेवाकार्यांना भेटी दिल्या आणि गरजूंना पुरविल्या जात असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात तकिया जिमखाना आणि जयताळा एकात्मता नगर येथे प्रारंभ करण्यात आलेल्या कम्युनिटी किचनला त्यांनी भेटी दिल्या. या दोन्ही ठिकाणी सुमारे दीड महिन्यांपासून प्रत्येकी 2000 लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली जात आहे. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात जवाहर विद्यार्थी गृह येथे कम्युनिटी किचन चालविले जात असून, 2000 गरजूंना तेथून अन्न पुरविले जात आहे. पूर्व नागपूर मतदारसंघात पाटिदार भवन येथून 5000 गरजूंना भोजन, तर मध्य नागपुरातील मेहंदीबाग तुळशीभवन येथे फुट पॅकेटस पुरविले जात आहेत. या भेटी आणि पाहणी दौर्‍यात नागपूर महानगर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, प्रा. अनिल सोले, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, किशोर वानखेडे, पारेंद्र पटले, लखन येरावार, आशीष पाठक इत्यादी सहभागी झाले होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार