सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुन्हा Lockdown होणार!

नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या भागात HOT SPOT आहे त्या भागासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 29 2020 8:50AM

ठाणे जिल्ह्यात लॉकडाउन (Lockdown) शिथिल केल्यानंतर काही भागात पुन्हा कोरोनाने (Coronavirus) डोकं वर काढलं आहे. विषाणू संसर्ग बाधीत रुग्णं वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबीवली, उल्हासनगर या महानगर पालिका क्षेत्रात (Thane, Navi Mumbai, Kalyan-Dombivali, bhiwandi,) कोरोना संसर्ग वाढणाऱ्या विभागात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.

नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या भागात HOT SPOT आहे त्या भागासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

'राज्यावर कोरोनाचे संकट हे दूर झाले नाही. आपल्याला कोरोनाविरोधात लढा द्यायचा आहे. पण कोरोनाला स्वत:हून बळी पडू नका' असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन वाढवण्यात येणार नाही, असं स्पष्ट केले आहे. परंतु, ज्या भागात कोरोनाची परिस्थितीत हाताबाहेर जाईल, अशा भागात लॉकडाउन लागू करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी लोकांना प्लाझमा दान करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 30 जूननंतर लॉकडाउन उठणार आहे का? असा सवाल विचारला जात आहे. त्याचे उत्तर नाही असे आहे. हळूहळू सर्व दुकानं सुरू करण्यात आली आहे. पण धोका अजून टळलेला नाही. आपण अनलॉकची सुरूवात केली आहे पण धोका अजूनही कायम आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार