सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पूजेसाठी आलेल्या गुरुजींनी आशीर्वादासोबत कोरोनाही दिला

नवविवाहित दाम्पत्याला एक छोटी चूक खूप महागात पडली आहे

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 13 2020 11:24AM

देशभरात कोरोनाचं थैमान सुरूच असताना ऑकडाऊनच्या नियमाचं पालन करून विवाह करणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याला एक छोटी चूक खूप महागात पडली आहे. लग्नानंतर घरात कथा वाचन आणि पूजा ठेवणं नवविवाहितांना भोवलं आहे. ही घटना मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये घडली.

गोविंदपुरा परिसरात नुकताच लॉकडाऊनच्या नियमाचं पालन करून विवाह सोहळा पार पडला. त्यानंतप परंपरेनुसार नवरदेवाच्या घरी कथा वाचन आणि पूजा होती. या पूजेला आलेले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं त्यांचा संसर्ग नवरदेव आणि त्याच्या भावाला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

लॉकडाऊनमध्ये सर्व गाइलाइनचं पालन करत विवाहसोहळा संपन्न झाला त्यानंतर घरी पूजा, कथा वाचन आणि आरती झाली. नवविवाहित दाम्पत्यानं गुरुजींचे आशीर्वाद घेतले आणि या आशीर्वादासोबतच कोरोनाही दिला. दुसऱ्यादिवशी घरी आलेले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती या नवरदेवाच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर पूजेसाठी उपस्थित असणाऱ्या 12 लोकांची चाचणी कऱण्यात आली. त्यामध्ये नवरदेव आणि त्याचा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर इतर सदस्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नवरदेवाला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं तर वधूला तिच्या माहेरी पाठवण्याची व्यवस्था कुटुंबीयांनी केली. भोपाळमध्ये 24 तासांत 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार