सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अमानुष कृत्याने गर्भिणी हत्तीणी चा दुर्दैवी मृत्य

या घटनेने माणूस म्हणून लाज वाटते सुबोध भावे

Snehal Joshi
  • Jun 4 2020 4:28PM

 मरण शहराकडे बोलवतो असं म्हटलं जातं. या गर्भिणी दुर्देवी हत्तीणीच्या बाबतीतही तसंच झालेलं दिसतंय. भूक लागली म्हणून गावात शिरलेली ही गर्भिनी, केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील मन्नारक गावात शिरली आणि फटाक्यांनी भरलेला अननस खाल्ल्यानंतर ही गर्भ हत्तीण  तीन दिवस नदीतच  मृत्यूची वाट पाहात उभी होती.

 मनुष्याला लाजवेल असे हे कृत्य या गावातील अज्ञात नागरिकांकडून घडले आहे.
 हत्तीणीच्या मृत्युनंतर पोस्टमार्टम केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे कळल. 

   स्फोटकांमिळे हत्तीणीला वेदना झाल्याने ती तीन दिवस वेलियार नदीत उभी राहिली. या हत्तीणे  सोंड आणि तोंड पूर्णवेळ पाण्यात बुडवून ठेवलं होतं. तिच्या जबड्याच्या दोन्ही बाजूंना गंभीर जखमा झाल्या आणि तिचे सुळेही तुटले होते. पाण्यात उभ्या या  हत्तीणीचा अखेर 27 मे ला  दुर्दैवी मृत्यू झाला.

 याप्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हत्तीणी च्या मृत्युनंतर सोशल मीडियावर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. त्यात अनेक नेते आणि अभिनेते यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
 तर अनेक सामाजिक संस्था आणि सगळ्या सोशल मीडियावर या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेण्यात यावी. आणि जी शिक्षा मनुष्यवधाचा साठी होते. तीच शिक्षा या घटनेच्या गुन्हेगारांना देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

कोरोना के कारण पीड़ित गरीब लोगो के लिए आर्थिक सहयोग

Donation
0 Comments

संबंधि‍त ख़बरें