भारतीय स्टेट बँकेने ठेवींवरील व्याजदरात 0. 40 टक्क्यांची कपात केली आहे. आजपासून ठेवींवरील नवे दर लागू करण्यात आल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.
व्याजदर उतरल्याने बँकेच्या कोट्यवधी ठेवीदारांना याचा फटका बसणार आहे. 7 ते 45 दिवस कालावधीसाठी आता सर्वसामान्य नागरिकांना 3.3 % ऐवजी 2.9 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 3.8 टक्क्यांऐवजी 3.4 % व्याज मिळेल. 1 ते 2 वर्ष मुदतीच्या ठेवींसाठी 5.1 टक्के, 3 ते 5 वर्ष मुदतीच्या ठेवीवर 5.3 टक्के तर 5 वर्षाहून अधिक आणि एक वर्षाहून कमी कालावधीसाठी 5.4 टक्के व्याज मिळेल.
ज्येष्ठ नागरीकांना 1 वर्ष ते 4 वर्षापर्यंतच्या मुदतीसाठी 5.6 टक्के व्याज मिळेल. यापूर्वी ते 6 % होते. 5 ते 10 वर्षाच्या मुदतीसाठी 5.2 % व्याज मिळणार आहे.