सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कर्तव्यावर "कोरोना चा घात "

राज्यात 1964 कोरोनाबाधित पोलिस

ऐश्वर्या डुबे
  • May 27 2020 5:52PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका वाढत आहे. राज्यातील 1964 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 223 अधिकारी आणि 1741 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 849 पोलिसांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 1095 पोलीस कोरोनाबाधित असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार घेत असलेल्या पोलिसांमध्ये 155 अधिकारी आणि 940 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

आतापर्यंत 67 अधिकारी आणि 782 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. मृत्यू झालेल्या पोलिसांमध्ये 1 अधिकारी आणि 19 कर्मचारी होते. पोलिसांना कोरोना संदर्भात कोणतीही लक्षणे आढळल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत यासाठी राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच 1353 रिलीफ कॅम्प अंतर्गत 82,422 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार