सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोना चौकशी ला युरोपियन महासंघाचा पुढाकार - चीन चा नकार

कोरोनाचा प्रसार चीनमुळेच झाला

ऐश्वर्या दुबे
  • May 21 2020 11:31AM

जगभरातून निर्माण झालेल्या दबावासमोर अखेर चीनने मान तुकविली आहे. कोरोना विषाणूचे उगमस्थान शोधण्यासाठी होणाऱया चौकशीला सहकार्य करण्याचे आश्वासन त्याने सोमवारी दिले. या संबंधीच्या युरोपियन महासंघाच्या प्रस्तावाला त्याने मान्यता दिली. यापूर्वी चीनने अशा कोणत्याही चौकशीला सहकार्य न करण्याची ताठर भूमिका घेतली होती. भारतानेही ही चौकशी झाली पाहिजे असा आग्रह धरला होता. अखेर चीनने या प्रकरणी माघार घेतली आहे.

कोरोनाचा जगभर प्रसार चीनमुळेच झाला असा आरोप आहे. काही तज्ञांनी हा विषाणू चीननेच निर्माण केला आहे, असेही प्रतिपादन केले आहे. त्यामुळे हा विषाणू नेमका कोठे असा जन्मला आणि त्याचा जन्मदाता कोण आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी जगभरातून केली जात होती.

युरोपियन महासंघाच्या प्रतिनिधीने चौकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव जागतिक आरोग्य महासभेत (डब्ल्यूएचए) मांडला होता. भारतही या महासभेचा सदस्य आहे. या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले त्यावेळी भारतानेही प्रस्तावाचे समर्थन केले. प्रस्तावात चीनचे नाव उघडपणे घेण्यात आले नसले तरी रोख चीनकडेच आहे हे स्पष्ट होत आहे. बहुतेक सर्व राष्ट्रांनी या प्रस्तावाचे समर्थन केल्याने चीनचा नाईलाज होऊन त्याने चौकशीला मान्यता दिली आहे

मूळ विषाणू केले नष्ट

कोरोनाचे मूळ विषाणू आपण नष्ट केल्याची कबुली चीनने काही दिवसांपूर्वी दिली आहे. मात्र चीन जगाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आजही चीनमध्ये या विषाणूवर प्रयोग सुरू आहेत. एकतर चीनने हेतुपुरस्सर जगात हा विषाणू पसरविला असावा, किंवा निदानपक्षी या विषाणूच्या घातकतेची माहिती जगाला वेळेवर दिलेली नसावी. म्हणजेच हे चीनचेच कारस्थान असावे किंवा निष्काळजीपणा तरी असावा असा आरोप जवळजवळ सर्व देश करीत आहेत. त्यामुळे चीनची चौकशी करून उत्तरदायित्व निश्चित करावे अशी आग्रही मागणी असून अमेरिकेने चीनविरोधी आघाडीत पुढाकार घेतला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार