सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी विनामास्क मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पूजा केली

आज पहाटे साडेपाच वाजता काँग्रेसचे पुरंदरचे आमदार संजय जगतापयांच्या हस्ते सपत्नीक खंडेरायाची महापूजा, अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

Aishwarya Dubey
  • Nov 16 2020 11:31AM

 गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरं अखेर आजपासून उघडण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नियम आणि अटींसह परवानगी देण्यात आली आहे. पण, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या आमदाराने नियम मोडल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी विनामास्क  मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पूजा केली आहे.

गेली आठ महिन्यांपासून जास्त काळ जेजुरीचा खंडोबा गड कोरोनाच्या परिस्थितीमुळे बंद होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर मंदिरे भाविकांसाठी देव दर्शनासाठी उघडण्यात आली आहेत.  आज पहाटे साडेपाच वाजता काँग्रेसचे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सपत्नीक खंडेरायाची महापूजा, अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

देवाची भूपाळी, सनईचे मधुर सूर आणि महाआरतीच्या मंगलमय वातावरणात आज जेजुरीगड जागा झाला. पण, मुख्य गाभाऱ्यात जगताप यांनी सहपत्नी पूजा केली तेव्हा त्यांनी मास्क घातला नव्हता. एवढंच नाहीतर पूजा करवून घेताना पुजाऱ्यांनी सुद्धा मास्क घातलेला नव्हता. राज्य सरकारने मंदिरं उघड असताना मंदिरात मास्क वापरणे बंधनकारक आहे, असं स्पष्टपणे सांगितले होते. पण, जगताप आणि मंदिर प्रशासनाकडून नियमांची पायमल्ली केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, देव संस्थानाकडून यासाठी शासकीय नियम व अटी पाळत भाविकांना दर्शनाची सुविधा निर्माण केला आहे. सॅनिटायझेशन, थर्मल स्कॅनिंगची सुविधा निर्माण केली असून एका वेळी 100 भाविकांना गडकोटात सोडण्यात येणार आहे. मुख्य प्रवेश द्वारातून गडकोटात प्रवेश देण्यात येणार आहे तर दर्शनानंतर माघील पश्चिमेच्या दरवाजातून बाहेर पडता येणार आहे. भाविकांना कासाववरून मुख दर्शन दिले जाणार आहे.

मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

रविवारी संध्याकाळपासूनच राज्यभरातील मंदिरांमध्ये साफ सफाई करून भाविकांसाठी मंदिरं उघडण्यात आली आहे. पण, बऱ्याच ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. पुण्यात मंदिर उघडण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत म्हणून पुणे शहरातील आठही विधानसभा मतदार संघातील मंदिरामध्ये शिवसेनेच्या वतीने, सुरक्षित अंतर राखून आरती करण्यात येणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार