सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठा आरक्षणामध्ये शरद पवारांनी मध्यस्थी करावी : खा. छत्रपती संभाजीराजे भोसले

खासदार संभाजीराजेंनी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची घेतली भेट

Abhimanyu
  • Sep 17 2020 12:57PM

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्या नंतर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत खासदार छत्रपती संभाजीराजेंनी शरद पवारांना  मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी  अशी विनंती केली आहे.

 

सर्वोच्च न्यायलयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. यानंतर खासदार संभाजीराजेंनी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली असुन  पवारांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी, अशी विनंती संभाजीराजेंनी शरद पवारांना केली आहे.

 राज्यसभेत खासदार संभाजीराजेंनी  मराठा आरक्षणविषयीची मागणी केली असुन “महाराष्ट्रातील सर्व राज्यसभा आणि लोकसभा खासदारांनी आपापल्या परीने सभागृहात मराठा आरक्षनासाठी आवाज उठवावा याकरिता खा. संभाजीराजे सर्वांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील मराठा आरक्षणाचा विषय निर्णायक वळणावर येऊन थांबला आहे. आता मराठा  आरक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. तामिळनाडूला वेगळा व महाराष्ट्राला वेगळा न्याय का?” असा प्रश्नही यावेळी खा. संभाजीराजेंनी उपस्थितीत केला आहे.

 

 

 

आरक्षण सुनावणी घटनापीठाकडे वर्ग

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिलीय . मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. घटनापीठाच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नसुन. मराठा आरक्षणाअंतर्गत 2020 आणि 2021 मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. घटनापीठाच्या अंतिम निकालानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी ठाकरे  सरकारला करता येणार आहे. 

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार