सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

।। गौरवशाली इतिहास - हिंदवी स्वराज्य ।।

हिंदुस्थानातील समस्त वंदनीय मातृशक्ती तथा पितृशक्तींना पवित्र हिंदुसाम्राज्यदिन /शिवराज्याभिषेक दिनाच्या आत्मीय मंगलमय शुभेच्छा.

तुषार रमेशराव दुधबावरे
  • Jun 7 2020 10:43AM
 प्रथमतः हिंदुस्थानातील समस्त वंदनीय मातृशक्ती तथा पितृशक्तींना पवित्र हिंदुसाम्राज्यदिन /शिवराज्याभिषेक दिनाच्या  आत्मीय मंगलमय शुभेच्छा.
     शिवराज्याभिषेक दिना निमित्ताने माझ्या सुमधुर लेखणीमधुनी 2 शब्दसुमने ...
निश्चयाचा महामेरु । बहुत जनासी आधारु ॥
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥U
आचारशील, विचारशील । दानशील, धर्मशील ॥
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायी ॥
        ।।शिवकल्याणराजा शिवछत्रपती ।।

मराठेशाहीच्या इतिहासातील प्रत्येक पान अनेक शूर वीर योद्ध्यांच्या पराक्रमाने सजलेलं आहे. हे विशेष

      " आपल्या उभ्या  हिंदुस्तानाला गौरवशाली इतिहासाची परंपरा आहे चं, हिंदुस्तान अर्थात भारत देश हा नररत्नांची खाण आहे. अनेक शूर योद्धे लढवय्यांची नावे भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेली आहेत. प्रत्येक शूरवीर योद्ध्याने युद्धभूमीवर वीरश्री पराक्रम  गाजवून पुढील पिढ्यांना गर्व वाटावा आणि सकारात्मक प्रेरणा मिळावी असे कार्य केले आहे. ह्या वीरांकडे दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, प्रचंड सामर्थ्य ,उत्तम संघटनशक्ती, नेतृत्वक्षमता, समर्पक भाव,  काळाच्या पुढील  आगामी प्रशासकीय योजना हे  अंगभूत गुण होते.
     शौर्य  पराक्रमाचे ,  त्याग - बलिदानाचे अनेक प्रसंग हिंदुस्थानाच्या भूमीला  इथल्या पवित्र मातीला स्पर्शीले आहेत
 #" मित्रहो ,धर्म , सत्य ,पराक्रम , त्याग ,समर्पण ,बलाढ्य ,साहस, अजिंक्य ,  शौर्य , स्त्रि जातीचं आदर , मान सन्मान इत्यादी घटकाविषयी जेव्हा जेव्हा चर्चा होते  ,अशा विशेषणांचा जेव्हा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा तेव्हा ही अखंड भारत भूमी त्या थोर महापुरुषाला स्मरण केल्या शिवाय राहणार नाही.
   " सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात घोंगवणारे पराक्रम, कुशल संघटन चा  वादळ    ,सह्याद्रीच्या वाघाला संपूर्ण विश्व छत्रपती शिवाजी महाराज (निश्चयाचा महामेरू) या नावाने परिचित आहे....
" छत्रपती शिवाजी महाराज "  हे नाव घेताच अंगावर काटा उभा राहतो. हृदयाचे ठोके वाढतात .शरीरात एक वेगळीच सकारात्मक साहसी उर्जा निर्माण होते...छाती अभिमानाने फूलते...
         "महाराजांचं  एखादं गाणं जरी कुठल्या डीजे बॉक्स वर , वा कुठल्या मोबाईल वर ऐकले ना तर अंगावर शहारे ,रोमांच आल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित ..... ह्यांचे नुसते नाव जरी घेतले तरी प्रत्येक मराठी हिंदू माणसाच्या मनात अभिमानाची , स्वाभिमानाची भावना आणि अंगावर रोमांच उभे राहतात. महाराज म्हणजे समस्त महाराष्ट्राचे खरे तर हिंदू माणसाचे दैवत! त्यांच्यासारखा राजा कधी झाला नाही आणि परत होणारही नाही.
    ।। जीवनामध्ये जसा शरीरासाठी  व्यायाम गरजेचा असतो , बुद्धीसाठी वाचन गरजेचं असतं  त्याच धर्तीवर जीवनामध्ये  कोणत्याही क्षेत्रात दिग्विजय यश प्राप्त करायचे असल्यास नियोजन /व्यवस्थापण या घटकाशिवाय पर्याय च नाही  असे ठामपणे आपले विचार मांडून आपल्या विचारांना कृती मध्ये परावर्तित करून भविष्याचा वेध घेऊन व्यवस्थापणाची नवी संकल्पना मांडणारे आधुनिक जगतातील  व्यवस्थापणाचे जनक ..छत्रपती शिवाजी महाराज...
       "बाल शिवबांचा जन्म ज्या कालखंडात झाला ( 19 एप्रिल 1630 , जुन्नर, पुणे) तो काळ भारतमातेच्या हिताकरिता , जनतेच्या संरक्षणाकरिता अतिशय संवेदनशील असा काळ होता ...परकीय मोगल आक्रमकांच्या घोड्यांच्या धावत्या पावलांनी जणू भारत मातेला असह्य वेदना होत होत्या....तत्कालीन समयी महाराष्ट्राच्या बऱ्याच भागावर अहमदनगरच्या निजामशाहा व विजापूरच्या आदिलशाहा हे दोन संस्थानिक जनतेसाठी जुलमी, अत्यंत क्रूर राज्य करीत होते.
या दोघांच्या युद्धामध्ये जनतेचे हाल बेहाल होत असे...क्रित्येक मातृशक्तींच्या आब्रू लुटल्या जात होत्या , मंदिरे उध्वस्त करत होती ,  गावातील मालमतेची नासधूस क्रित्येक बालकांच्या कत्तली होत होत्या..आपल्याच देशात आपल्याच भारतीय बांधवांना सण ,उत्सव करणे धोक्याचे वाटू लागले..
    "कालांतराने , बालशिवबा वयाने सामर्थ्याने मोठे होऊ लागले , समज वाढू लागली. बाल शीवबांनी आपल्या निष्ठावंत सवंगड्यासह  रायरेश्वराच्या मंदिरात  स्वराज्याची प्रतिज्ञा केली.
स्वराज्यस्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली,पण न डगमगता शिवराय मोठ्या शौर्याने व चातुर्याने पार पडले. तानाजी ,बाजीप्रभू ,मुरारबाजी ,असे अनेक मातब्बर ,समर्पक निष्ठावंत पराक्रमी योढ्यांनी  स्वराज्यासाठी आपले प्राण वेचले. सर्वस्व पणाला लावले.
     "भारताच्या मध्ययुगीन कालखंडामध्ये  विशेषत: महाराष्ट्राच्या 2000 ते 2500  वर्षाच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण अलौकिक  अशी सुवर्णमय घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक सोहळा होय. हिंदवी स्वराज्य म्हणजेच सार्वभौम राज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात नवे पर्व सुरू केले. स्वराज्याचेच नंतरच्या काळात विशाल साम्राज्यात रुपांतर होऊन हिंदुपदपादशाही असे नाव त्यास प्राप्त झाले. भारतातील सर्वांत शक्तिशाली सत्ता म्हणून मराठ्यांचे साम्राज्य /हिंदवी स्वराज्य ओळखले जात होते.

   "शिवाजी महाराजांनी या स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यानी मान्यता दयावी ,म्हणून  राज्यभिषेकाची योजना आखली. 6 जून इ.स. 1674 रोजी शिवाजीराजांचा रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. 
       "विश्वमाता पूजनीय वंदनीय जिजाऊ माँसाहेब  व महान पराक्रमी शहाजी राजाच्या वाघाने मोगल सल्तनत मध्ये हाहाकार मचवत ,आपल्या कुशल संघटन व युद्ध कौशल्याच्या बळावर मोगलांना नेस्तनाबूत केले , सळो की पळो करून सोडले व समस्त जनतेच्या हक्काचे रामराज्य , हिंदवी स्वराज्य स्थापन केले व स्वराज्याचे पाहिले छत्रपती म्हणून ज्या राजाचं राज्याभिषेक झालं असे महापराक्रमी शहाजीराजे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज.... ज्यांनी परकीय आक्रमक क्रूर मोगलांच्या 750 वर्षेच्या गुलामगिरी , पारतंत्र्यामधून मधून या भारत मातेला मुक्त केले व स्वराज्य स्थापन केले ..ज्या राजांची कीर्ती समस्त महाराष्ट्र भूमी चं काय ,अखंड हिंदुस्तान , अहो अखंड हिंदुस्तानचं काय ? सातसमुद्रा पार ही ज्यांच्या गनिमी काव्याचा गौरव होतांना आपण बघतो आहे.... असा लोकप्रिय , जाणता राजा आपल्या महाराष्ट्र भूमीला लाभले व त्यात ही आपण या पवित्र अशा शिवरायांच्या मातीत जन्म घेतला हे आपले भाग्यच म्हणावे की काय ! 
    "शेकडो वर्षांनंतर सर्व धर्माना समतेने  वागवणारा,प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे,म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही,त्यांनी स्वराज्य , जनतेचं राज्य भक्कम करण्यासाठी केले. 
      विद्वान ब्राह्मण सरदार कामदार यांना आमंत्रणे दिली गेली. राज्याभिषेकाचे विधी करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले. ते थोर पंडित होते.संस्कृत चे उत्तम जाणकार होते .
      संपूर्ण विश्वातील  सेनानायकांच्या क्रमांकात शिवाजी महाराजांचे स्थान प्रथम दर्जाचे आहे. 1645- 1680 या शिवरायांच्या संपूर्ण कारकिर्दीत बलाढ्य मोगलांचा किवा विजापूरकरांचा असा एकही हिंदू किवा मुस्लिम सेनानायक नव्हता की, ज्यांचा शिवाजी महाराजांनी पराभव केला नाही. शहाजादे, इराणी व पठाण सरदार तसेच जसवंतसिंह राठोडसारखे राजपूत राजे या सर्वांनी छत्रपती शिवरायापुढे हात टेकले होते. वैयक्तिक शौर्य, संघटक व नायक म्हणून शिवाजीराजे अग्रगण्य ठरले होते. अफजलखानाशी केलेले युद्ध, शायस्तेखानावर छापा टाकुन त्याची बोटे कापली ,  सुरतेची लूट, एवढेच नाही तर जुलमी औरंगजेबाच्या दरबारात त्यांनी केलेला बिनधास्त प्रवेश या सर्व  गोष्टी  महाराजांच्या साहस पराक्रम चतुर्याची प्रचिती देतात. 
        " शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य / राष्ट्र उभे केले. हिंदवी स्वराज्यात एक आरुषी निर्माण झाली.आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य परकीय शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. व आजही आधुनिक जगातील अनेक  बलाढ्य राष्ट्रे या गनिमी काव्याचा वापर करताना आपण बघतो आहे.
      महाराजांनी,  सुमारे 111 किल्ले  बांधली तसेच त्यांनी 49 किल्ले पुनरदुरुस्ती  करून त्यात आवश्यक ते बदल केले व ते किल्ले अभेद्य बनविले.
     शिस्तबद्ध शासन , न्यायदानात निष्पक्षता दर्शविली, गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक वृत्ती दिलीय. सर्व धर्मांना समान लेखले, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट  ही आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. ह्या गौरवशाली मातीतील इतिहासाचे साक्षीदार होऊन माझ्यातदेखील एक आरुषी निर्माण झाली. नवं युग निर्माण झाल. रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱ्या महात्म्याप्रमाणे ते वंदनीय थोर पुरुष च होते. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार