सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

गेल्या दोन तीन दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घेण्याचं आवाहन भुजबळांनी केलं आहे

Sudarshan MH
  • Feb 22 2021 10:35AM

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. छगन भुजबळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांची आढावा बैठक देखील पार पडली होती.

रविवारी साहित्य संमेलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह देखील भुजबळांची बैठक पार पडली होती. तसंच शरद पवार आणि अजित पवार यांच्या सोबत भुजबळांनी आमदार सरोज आहेर यांच्या लग्नातही हजेरी लावली होती. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाच्या धोक्याची शक्यता आहे.

 

 

 

 

 

'माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.' असं ट्वीट करत भुजबळ यांनी कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचं आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार