सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निसर्ग चक्रीवादळात विस्कळीत झालेले संसार पूर्ववत करण्यास विहिंप, बजरंग दल, सरसावले

निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरातील फणसराई, वनाटी, उदेवाडी व राजमाची या अतीदुर्गम भागातील आदीवासी ठाकर, कातकरी बांधवांच्या घरांची, झोपड्यांची, गोठ्याांची प्रचंड प्रमाणात हानी झाली होती. घरांवरील छत उडुन गेले होते,

Deepak Chauhan
  • Jun 16 2020 9:19AM
निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरातील फणसराई, वनाटी, उदेवाडी व राजमाची या अतीदुर्गम भागातील आदीवासी ठाकर, कातकरी बांधवांच्या घरांची, झोपड्यांची, गोठ्याांची प्रचंड प्रमाणात हानी झाली होती. घरांवरील छत उडुन गेले होते, घरातील भांडी, कपडे व अन्य साहित्य वादळाच्या तडाख्याने दरीत उडून गेले होते अशात अन्नधान्य भिझल्यामुळे खाण्याची बिकट अवस्था झाली होती. या निसर्ग वादळाच्या तडाख्यामुळे अनेकांचे संसार मोडुन पडले. या नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या संकटात विश्व हिंदु परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते कर्तव्य तत्परतेने पुढे आले यामध्ये चिंचवड येथील इस्कॉन कृष्णभक्त मंडळ सहभागी झाले. निसर्ग चक्रीवादळाच्या दुसऱ्याच दिवशी कार्यकर्त्यांनी परिसरात जाऊन झालेल्या हानीची पाहणी केली व बांधवांना धिर दिला लगोलग वनाटी व फणसराई येथील सर्व कुटुंबांस आवश्यक शिधा संच पुरविण्यात आले. दि ५ जुन ते ९ जुन सलग ५ दिवस कार्यकर्त्यांनी पीडित बांधवांची पडलेली, विस्कटलेली घरे बांधून देण्यासाठी सुमारे ३५ मोठ्या ताडपत्र्या, मुबलक प्रमाणात दोर, तार असे नवीन साहित्य दानशूर व्यक्ती व संस्थांच्या सहकार्यातून उभे केले. श्रमदान करून घरे, झोपड्या पुन्हा निवासायोग्य करून देण्यात आले. प्रत्येक कुटुंबास दोन ब्लँकेटस, माता भगिनींस साड्या, लहान मुलांना नविन कपडे, खाऊ, पुरुष मंडळींना कपडे पुरवून परिसरात औषध फवारणी करून स्वच्छता करण्यात आली.
वाड्यांवर वृक्षारोपण करण्यात आले.
आगामी काळात लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन यांच्याशी पाठपुरावा करून बाधित घरे व परिवारांचे योग्य पुनर्वसन व्हावे त्यांची निवासी घरे शासकीय नोंदीने नियमित व्हावीत यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे सर्व स्थानिक कार्यकर्ते सर्वंकष प्रयत्न करणार असा संकल्प करून त्यांस पूर्ण विश्वास व धीर दिला. शुक्रवारी 200 सिमेंट पत्रे वनाटी फणसराई येथे दिले, रविवारी दि. १४ रोजी नाणे मावळतील कुसुर पठारावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणारे धनगर बांधवांच्या ४२ घरांची पडझड झाली होती. प्रशासकीय मदत 10 दिवस उलटून पण अजुन मदतीसाठी तिथे पोहचली नाही. म्हणून विश्व हिंदु परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते बांधवांना घरावर टाकायला ताडपत्री, मुलांना कपडे, सॅनिटायजर, मास्क, तसेच लाईट नसल्या कारणाने मेणबत्त्या इत्यादी साहित्य देण्यात आले.


या सर्व सेवा कामात ईस्काॅन, आमदार सुनिल शेळके, सह्याद्री प्रतिष्ठान यांनी मोलाचे सहकार्य केले..
करोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करित योग्य ती काळजी घेऊन सदर मदत कार्य केले गेले. या दिवसात प्रतिदिवस वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी आळीपाळीने जाऊन मदत कार्य केले. या वेळी बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र संयोजक लहुकुमार धोत्रे, अशोक येलमार, नितीन वाटकर, धनाजी शिंदे, संदेश भेगडे, कुणाल साठे, मुकुंद चव्हाण, संजय शेळके, नाना सावंत, संभाजी बालघरे, अभिजीत शिंदे, अमित भेगडेे, बाळासाहेब खांडभोर, प्रशांत मोरे, चंद्रशेखर अहिरराव आदि कार्यकर्त्यांनी श्रमदानात भाग घेतला तर पाहणी, माहिती संकलन व शिधावीतरण कार्य प्रवीण देशमुख, अजय शेलार, शुभम कुल, गणेश निसाळ, अक्षय भेगडे, विनायक भेगडे व श्रीनिवास कुंडल यांनी पार पाडले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार