सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकऱ्यांचा आज देशभर ‘चक्का जाम’

सोशल मीडियावर 'भारत बंद'च्या अफवा

Sudarshan MH
  • Feb 6 2021 11:47AM

कृषी कायद्यावरून संसदेत रणकंदन सुरू असतानाच आज आंदोलक शेतकऱ्यांनी देशभर ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. राजधानी दिल्लीला या आंदोलनातून वगळण्यात आलं असून, देशभरात तीन तास आंदोलन केलं जाणार आहे. कृषी संयुक्त किसान मोर्चाने याबद्दल शुक्रवारी माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांवर आंदोलन केलं जाणार असून, कोणत्या वाहनांना जाण्यास मूभा दिली जाईल, याबद्दलही मोर्चानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनला पाठिंबा दिला आहे.

देशभर राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर आज (६ फेब्रुवारी) दुपारी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे. दिल्ली वगळता देशात इतरत्र तीन तास चक्का जाम करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या काळात शाळेच्या बस, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना वगळण्यात आलेलं आहे. किसान मोर्चाने ही माहिती दिली आहे. ‘चक्का जाम’च्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मोठा फौजफाटा तैनात करण्याबरोबरच रस्तेही बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, चक्का जाम आंदोलन नसून, भारत बंद असल्याच्या अफवाही सोशल मीडियातून पसरवल्या जात असल्याचं समोर आलं आहे.

 

किती वेळ चालणार आंदोलन? दिल्लीबरोबरच कोणत्या राज्यात नसणार चक्का जाम

शनिवारी १२ ते ३ या वेळेत चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे.उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडमध्ये चक्का जाम आंदोलन केलं जाणार नाही. उर्वरित देशभरात आंदोलन होणार असून, अत्यावश्यक सेवेतील आणि शाळेच्या बस व रुग्णवाहिकांना जाऊ देण्याचे निर्देश संयुक्त मोर्चाने आंदोलकांना दिले आहेत

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार