सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पोर्श कार अपघात प्रकरणात ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अपघातानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीची पोलिसांनी ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती.

Shruti Patil
  • May 27 2024 10:48AM

पुणे: पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दुचाकी उडवली होती. १८ मे रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत असून, आता ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीची पोलिसांनी ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने जे तपासणी करण्यासाठी घेण्यात आले होते. त्यावेळी ससून रुग्णालयामध्ये ड्युटीवर असलेले सीएमओ डॉ. श्रीहरी हाळनोर आणि डॉ. अजय तावरे यांनी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आरोपीचा पूर्ण ब्लड रिपोर्ट बदलला गेला. या रिपोर्टमुळे या केसची पूर्ण दिशाच बदलण्याची शक्यता होती.

परंतु, सुदैवाने पोलिसांनी दुसऱ्यांदा त्या मुलाचे ब्लड सॅम्पल घेऊन ठेवलेले होते. त्या सॅम्पलची डीएनए चाचणी देखील करण्यात आली आहे. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी संध्याकाळी कारवाईची सविस्तर योजना आखत तावरे व हरनोर या दोघांना पहाटे त्यांच्या घरामधून अटक केली. या कारवाईमुळे पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात देखील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांचा कथित सहभाग उघड झाला होता. त्यानंतरही ससून रूग्मलयामध्ये गैरप्रकारांची मालिका सुरूच आहे. डॉ अजय तावरे यांना काही दिवसांपूर्वी एक रुग्ण उंदीर चावून दगावल्याच्या कारणावरून पदावरून दूर करण्यात आले होते. त्यानंतरही डॉ. तावरे यांनी कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी मदत केली आणि त्याच्या रक्ताचे नमुने बदलले. त्या बदललेल्या सॅम्पल्सवर आधारित अहवाल त्यांनी दिला. या अपघात प्रकरणात डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांना मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाल्याची चर्चा जोरात सुरु आहे. या दोघांना कोणी संपर्क साधला? आणि त्यांच्यापर्यंत पैसे कोणी पोहोचवले? याचा आता तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार