ना. गडकरींतर्फे जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळीच्या नागपूरकर जनतेला, भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना, मित्र व चाहत्यांना केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोनाची भीती अजून संपलेली नाही. सण उत्साहात साजरा करा. सणांचा आनंद लुटा. मात्र कोरोनाचे सर्व नियम कठोरतेने पाळून सण साजरा करा. स्वत:ला जपा. इतरांनाही जपा.