शासन विद्युत सहायकांच्या आत्महत्येची वाट पाहात आहे काय? : बावनकुळे
शासन विद्युत सहायक आणि अन्य उमेदवारांच्या आत्महत्या होण्याची वाट पाहात आहे काय, अशी संतप्त विचारणा माजी ऊर्जामंत्री आणि भाजपाचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकार आणि ऊर्जामंत्र्यांना केली आहे.
नागपुरात आज संविधान चौकात शासनाच्या या नकारात्मक भूमिकेचा आणि दिरंगाईचा निषेध करण्यात आला.