कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत नवरात्रोत्सव कसा साजरा करावा ?
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली दळणवळण बंदी, तसेच काही निर्बंध यांमुळे यंदा काही ठिकाणी नवरात्रोत्सव नेहमीप्रमाणे साजरा करण्यावर मर्यादा येणार आहेत. अशा वेळी ‘नवरात्रोत्सव कशा पद्धतीने साजरा करायला हवा ?’ असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.