योगी सरकारच्या निर्णयाची स्तुती, जय जिजाऊ, जय शिवराय!
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथे निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल अशी घोषणा केल्यावर फडणवीस यांनी या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे. "जय जिजाऊ, जय शिवराय ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय! " असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांचा जयजयकार केला आहे.