श्राद्ध करण्यात अडचणी आल्यास त्या दूर करण्याचे मार्ग धर्मशास्त्राने दिलेले अन्य पर्याय-
श्राद्धविधी करायला ब्राह्मण उपलब्ध नसल्यास हिंदु धर्मशास्त्रात पर्याय सांगितले आहेत. ते पर्याय भावपूर्ण केल्यास त्या श्राद्धविधीचा लाभ मिळतोच; मात्र काही जण ‘ब्राह्मण मिळतच नाहीत’, या नकारात्मक दृष्टीकोनातून ब्राह्मण शोधायलाच जात नाहीत किंवा ब्राह्मण मिळणे जरी शक्य असले, तरीही घरात परंपरेनुसार चालत आलेल्याच एखाद्या पद्धतीने श्राद्ध करतात. त्याने शास्त्राप्रमाणे श्राद्धविधी करण्याच्या तुलनेत अल्प लाभ मिळतो किंवा मिळतही नाही.’