प्रणव मुखर्जी सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व : नितीन गडकरी
एका सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्वाचे धनी ते होते. देशाचे ते ऐतिहासिक आणि असे राजकीय नेते होते की, जी भूमिका त्यांना वेळोवेळी मिळाली ती त्यांनी कर्तव्य म्हणून उत्तम प्रकारे पार पाडली, अशी प्रतिक्रिया केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.