मिशन विश्वास- नागपूर महानगरपालिकेसोबत सेवारत आहेत रा.स्व.संघ, लोक कल्याण समितीचे कोरोना वारियर्स
रुग्णांची वाढती संख्या बघता कोरोनाबाधित व बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना विलगित करणे यासाठी सरकारी यंत्रणा अपुरी पडत आहे. हे लक्षात घेऊन महानगर पालिकेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, लोक समस्या संशोधन व लोक कल्याण समितीच्या सहकार्याने 'मिशन विश्वास' हे अभियान सुरु केले आहे.