वाहतूक खर्चात बचत करण्यासाठीच चांगल्या महामार्गांची निर्मिती : नितीन गडकरी
महामार्गांवरून होणार्या वाहतुकीत वेळेची बचत व्हावी आणि वाहतूक खर्चातही बचत व्हावी, तसेच रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशानेच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण चांगल्या रस्त्यांची निर्मिती करीत असल्याची माहिती केंद्रीय महामार्ग बांधकाम, वाहतूक आणि परिवहन तसेच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.