जिल्हा लातूर शासकीय मेडिकल कॉलेज मधील नियम मोडणारे ते डॉक्टर कोण ? वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख लक्ष घालतील का ?
लातूर जिल्ह्याला वैद्यकीय शिक्षण खात अमित देशमुख यांच्या स्वरूपात मिळाले. कोरोनाच्या कठीण काळात वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून त्याचे कार्य उल्लेखनीय आहे.वैद्यकीय शिक्षण खात्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न अमित देशमुखांनी केला आहे आणि करतही आहेत. पण त्यांच्याच जिल्ह्यातील शासकीय विलासराव देशमुख वैद्यकीय कॉलेज मध्ये वैद्यकीय शिक्षण खात्याचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत असे चित्र सध्या लातूर मध्ये दिसत आहे.