निर्यातीसाठी वस्तू आंतरराष्ट्रीय दर्जाचीच असावी : नितीन गडकरी
निर्यातीसाठी देशातील उत्पादित वस्तूंचा दर्जा हा आंतरराष्ट्रीयच असला पाहिजे. तरच निर्यातीत देश पुढे जाईल. ज्या उद्योगांची उत्पादित वस्तू निर्यातीचा रेकॉर्ड चांगला आहे, अशा उद्योगांनी आता आपली निर्यात दुप्पट केली पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.