जळकोट, देवणी, चाकूर व शिरुर अनंतपाळ नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर चारही नागरी क्षेत्रात आचारसंहिता लागू.
राज्य निवडणूक आयोग यांनी दि. 24 नोव्हेंबर, 2021 च्या पत्रान्वये लातूर जिल्ह्यातील जळकोट, देवणी, चाकूर व शिरुर अनंतपाळ नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या आदेशाच्या तारखेपासून चारही नगर पंचायतीमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहणार आहे.