*आचार्य जितेंद्रनाथ महाराजांना अयोध्येचे निमंत्रण* *महाराष्ट्रातुन पवित्र मृत्तिका व जल भूमिपूजनाला नेणार*
समस्त रामभक्त हिंदू समाजात आनंदाची लहर उसळली आहे.
श्रीनाथ पीठ , श्रीदेवनाथ मठ हे भारतातील एक प्रमुख आध्यात्मिक आचार्य पीठ म्हणून ओळखल्या जाते. सुमारे ६०० वर्षांपासून विद्यमान असणाऱ्या प्राचीन श्रीनाथ पीठाचे स्वामी श्रीजितेंद्रनाथ महाराज हे अठरावे पीठाधीश असून अनेक शतकांपासून श्रीरामजन्मभूमी आंदोलनात या पीठाची सक्रीय भूमिका राहीली आहे.