श्रीराम जन्मभूमी मंदिर सामाजिक समरसतेचे अनुपम केंद्र होईल – मिलिंद परांडे
डॉ. हेडगेवार यांची संघ गंगा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमीतील समता गंगा यांचा जिथे उगम झाला त्या पवित्र स्थळी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या जन्मभूमीसंबंधीची पत्रकार परिषद होत आहे, याबद्दल आनंद वाटतो. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी स्वतःच्या जीवनातून सामाजिक समरसता आणि सशक्तीकरणाचा संदेश दिला.