एनआयएमएच वाचविण्यासाठी डॉ ऍड अंजली साळवे यांची आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांचेशी चर्चा
खाण कामगारांच्या आरोग्यासंदर्भात संशोधन व सेवा पुरविण्यासाठी नागपूर येथील राष्ट्रीय खणीकर्म आरोग्य संस्थेच्या (एनआयएमएच) स्वतंत्र शाखेसह आयसीएमआर अंतर्गत एनआयओएचचे प्रादेशिक कार्यालय संस्थेच्या मुळ उद्देशांसह नागपूर येथेच ठेवण्याच्या डॉ ऍड अंजली साळवे यांच्या आग्रही मागणीची दखल घेत राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री ना. राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली