*किरीट सोमैय्या, आ. डावखरे यांची वीज नियामक आयोगाकडे याचिका*
लॉकडाऊन काळातील वीज बिले भरण्यासाठी ६ महिने मुदतवाढ द्यावी, या काळात १०० युनिटपर्यंतची वीज मोफत द्यावी आदी मागण्या करणारी याचिका भाजपाचे माजी खासदार डॉ. किरीट सोमैय्या आणि ठाणे शहर भाजपा अध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांनी राज्य विद्युत नियामक आयोगापुढे दाखल केली आहे.