कुपोषण कमी करण्यासाठी स्थानिक भाषेत जनजागृती करा-ॲड. यशोमती ठाकूर
नंदुरबार दि.8:जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि बालवयात होणारे विवाह रोखण्यासाठी स्थानिक बोलीभाषेत जनजागृती करण्यात यावी, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.