जनता कर्फ्यू' ला प्रतिसाद देणाऱ्या नागपूरकरांना मनापासून सलाम! महापौर संदीप जोशी
आयुक्तांच्या बैठकीत लॉकडाऊन टाळण्याचेच मत मांडण्यात आले. त्यातून नागपूर शहरात शनिवार (ता. २५) आणि रविवारी (ता.२६) 'जनता कर्फ्यू'ची घोषणा करण्यात आले. आपल्या शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने 'जनता कर्फ्यू'चे काटेकोर पालन करीत भरभरून प्रतिसाद दिला.