*खासदार शरद पवार संरक्षण खात्याशी संबंधित समितीवर
राज्यसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी काल संपन्न होताच. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी खासदारकीची शपथ घेतली. यानंतर लगेचच शरद पवारांवर केंद्र सरकारनं महत्त्वाची जबाबदारी सोपवली. संरक्षण खात्याशी संबंधित समितीवर पवारांना सदस्य म्हणून स्थान देण्यात आले.