लहान उद्योगांना सूक्ष्म वित्तीय संस्थांच्या कर्जपुरवठ्याची आवश्यकता : नितीन गडकरी
देशातील लहान उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठी सूक्ष्म वित्तीय संस्थांच्या कर्जपुरवठ्याची आवश्यकता असून शासनाची भूमिकाही गैर बँकिंग वित्तीय संस्था आणि सूक्ष्म वित्तीय संस्थांना मदत करण्याचीच असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.