सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा ठाकरे सरकारचा डाव भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांचा आरोप

तुम्हाला शिक्षणाचा खेळखंडोबा करायचा आहे का, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतरही परीक्षा आणि प्रवेशाचे गाडे रुळावर आले नसताना त्यात मनमानी शुल्कवाढीची भर पडल्याने ठाकरे सरकारचा धोरणलकवा स्पष्ट झाला आहे, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. शैक्षणिक शुल्कनिश्चितीसाठी समिती हा निव्वळ वेळकाढूपणा असून शिक्षणसंस्थांच्या मनमानी फी आकारणीस चाप लावण्यात शासन सपशेल अपयशी ठरल्याची ही कबुली आहे, अशी टिका करून आमदार कराड म्हणाले की, मूल्यमापनाच्या आधारे दहावी-बारावीचे निकाल देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता संपविण्याचा शिक्षण खात्याचा डाव असल्याचे त्यांनी बोलून दाखविले अगोदर शुल्कनिश्चितीचा प्रस्ताव खुंटीवर टांगून ठाकरे सरकारने हजारो पालक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप दिला व शाळाचालकांना मनमानी शुल्कआकारणीस मुभा मिळाली.

Boost News

Rs. 0

Boost News Position in Website
ALL Category Price Per Day