पुणे- पिंपरी-चिंचवड ‘लॉकडाउन’मध्ये औद्योगिक कंपन्या सुरू ठेवण्याची परवानगी द्या : आमदार महेश लांडगे
कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी ‘लॉकडाउन’ करणे उचित आहे. पण, गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले औद्योगिक क्षेत्राचे अर्थ‘चक्र’ पुन्हा लॉकडाउन करुन बंद ठेवणे चिंताजनक आहे.