शिवसैनिकांनी संकट काळात जनतेला आधार द्यावा- संपर्क प्रमुख संजय मोरे
संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत रेणापुरात शिवसेना पदाधिकार्यांची बैठक. शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांच्या उपस्थितीत रेणापूर येथे शिवसेना पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली.सध्या कोरोनाचे संकट असून शिवसैनिकांनी या काळात जनतेला आधार द्यावा,अधिकाधिक लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन मोरे यांनी या बैठकीत बोलताना केले.