चाकूरच्या सीमा सुरक्षा दलात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देऊ खा.सुधाकर श्रृंगारे
चाकूर येथील सीमा सुरक्षा दलात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील असा विश्वास खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी सीमा सुरक्षा दलास दिलेल्या भेटीदरम्यान दिला.
यावेळी खा. सुधाकरराव श्रृंगारे यांनी सीमा सुरक्षा दलास भेट देऊन तेथील अडचणी,समस्या जाणून सर्व ठिकाणच्या स्थळाची पाहणी केली.