आपत्कालीन स्थितीत धर्मशास्त्रानुसार गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत !
५ जुलै २०२० या दिवशी व्यासपौर्णिमा, म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे. प्रतिवर्षी अनेक जण एकत्रित येऊन त्यांच्या संप्रदायानुसार गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करतात; परंतु या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने आपण एकत्रित येऊन गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करू शकत नाही.