पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते लसीकरणात चांगली कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सत्कार
नंदुरबार दि. 25 : राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते गावात 45 वर्षावरील 100 टक्के नागरिकांचे कोरोना लसीकरण करणाऱ्या सिंदगव्हाण, सागाळी आणि पुरुषोत्तम नगर या तीन ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला.