कोरोना बाधितांशी संवाद साधून त्यांना धीर द्या-ॲड.के.सी.पाडवी
नंदुरबार दि. 1 : जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांचा जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यासोबत त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचे कार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.