मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यपालांनी केले क्लस्टर विद्यापीठाचे उदघाटन*
पूर्वीच्या शिक्षण पध्दतीमध्ये संशोधनाला महत्व होते परंतु एकविसाव्या शतकात संशोधनाला अविष्कार, नाविन्य तसेच उष्मायनाची जोड देणे आवश्यक झाले आहे. यादिशेने शिक्षण संस्थांनी कार्य करुन सेंटर ऑफ एक्सलंस होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.