विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे घंटानाद आंदोलन !*
महाराजांचा अमूल्य ठेवा असलेल्या विशाळगडावर पुरातत्त्व आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. हे सर्व अतिक्रमण हटवण्यासाठी, तसेच पुरातत्त्व खात्याला जाग आणण्यासाठी आज ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने 19 मार्च या दिवशी कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले.