पिंपरी-चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा मिळणार
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे सर्वसामान्य नागरिकांची अर्थिक स्थिती विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून मिळकतकर वसुली करताना शास्तीकर अथवा दंड आकारणी केली जाणार नाही. मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, तशा हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत