१ जूनपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सुरू होणार
लॉकडाऊन 4.0ची अंमलबजावणी सुरू असतानाच केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या १ जूनपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. १ जूनपासून दररोज २०० नॉन एसी गाड्या धावतील आणि त्याची संख्या हळूहळू वाढवली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. या गाड्यांचं बुकिंग लवकरच सुरू केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं.